मवाना : ऊस विकास परिषद मवाना आणि मवाना साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन मवाना साखर कारखान्याच्या सभागृहात करण्यात आले होते. सैफपूर येथील ज्येष्ठ शेतकरी मनीराम हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार प्रमुख उपस्थित होते.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहाय्यक ऊस महाव्यवस्थापक एस. पी. सिंह यांनी वसंत ऋतुमधील ऊस लागवडीविषयी माहिती दिली. प्रजातींमध्ये बदल कसा करावा, प्रगत बियाणे कोणते आणि कसे वापरावे याची माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक सौवीर सिंह यंनी विभागाद्वारे सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. डॉ. नवीन चंद्रा यांनी हस्तिनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या योजना, संशोधन, कीड रोग व्यवस्थापन याची माहिती दिली. डॉ. संजय सिंह यांनी ऊस शेतीमध्ये यंत्रांच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. युनिट हेड संजय चौधरी, विरेंद्र सिंह, मनोजर सिंह, सुभाष खेडकी, चंद्रहास जयसिंगपूर, हर्षवर्धन प्रधान आदी उपस्थित होते.