सिंभावली : शेतकरी महाविद्यालयासमोरील कॅम्प कार्यालयात रविवारी भाकियू टिकेत गटाची मंडल स्तरावरील बैठक झाली. यावेळी थकीत ऊस बिलांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रीय उपाध्यक्ष कुशलपाल आर्य यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांसह मोदीनगर साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ६५० कोटी रुपये थकीत आहेत. सातत्याने कारखाना प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे तिन्ही कारखाने शेतकऱ्यांना फक्त आश्वासने देत आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी वीज कपात आणि कमी दाबाने वीज मिळत असल्याबद्दलही तक्रारी नोंदवल्या. जिल्ह्यात मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. सरकारने यावर उपाययोजना करावी यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. पंचायतीला उपस्थित राहिलेले सीओ आशुतोष शिवम, पोलीस ठाण्याचे प्रभारी शिलेष कुमार, एसडीओ तेजपाल सिंह, ज्युनिअर इंजिनीअर रामबली मौर्य, नायब तहसीलदार पवन कुमार यांच्यासह अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देवून समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली. यावेळी विरेंद्र सिंह, परवेज, अमन सिह, हरेंद्र सिंह, राजेंद्र सिंह, देवेंद्र कुमार, विनीता, तेजपाल सिंह आदींसह शेतकरी उपस्थित होते.