महापुरानंतर या रोगांशी होऊ शकतो आपला सामना; असा करा बचाव

ऑगस्ट 2019 च्या पहिल्याच आठवड्यात आपल्याकडील नद्यांना प्रचंड महापूर आला, ही नैसर्गिक आपत्ती आहे पण या नैसर्गिक आपत्तीसोबत रोगराई सुध्दा पसरते. शहरी व ग्रामीण भागात पुराचे पाणी वाहून आल्याने आपल्या समाजात लेप्टोस्पायरोसिस, अतिसार, कॉलरा, डेंग्यू, थायफाइड, मलेरिया, न्यूमोनिया, व्हायरल एन्सेफॅलोपॅथी प्रामुख्याने अन्न विषबाधा होण्यासारखे रोग पसरू शकतात.

हे रोग पुराचे पाणी सोसायट्यांमध्ये, घरामध्ये शिरल्यामुळे आणि मैला आणि इतर घटक मिसळल्यामुळे पाणी दूषित बनते, वातावरणात दुर्गंधी पसरते आणि रोगांचा प्रसार होतो.

या साथीच्या रोगांवरती मात करण्यासाठी, आपण पुढील काही मूलभूत प्रतिबंध करू शकतो:
1. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा.
2. ओले कपडे घालू नका.
३. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला मास्क चा वापर करा.
४. कचरा हाताळताना हातमोजे वापरा.
५. आठवड्यातून एकदा आपले नखे कापून घ्या कारण अनेक रोगांची संक्रमणे नखांद्वारा आपल्यामध्ये प्रवेश करतात.
६ .जर तुमच्या शरीरातील अवयवाला दूषिक संक्रमण चा स्पर्श झाला असेल तर, डेटोल सारख्या द्रावणाने आपले शरीर स्वच्छ करा.
७. बिना धुतलेली भांडी वापरू नका, स्वयंपाक करायच्या आधी कृपया तुमची भांडी व्यवस्थित धुऊन घ्या नंतर अन्न शिजवा.
८. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची लागण झाल्यास कृपया तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
९. पाण्यातील गढूळपणा दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करा.
10. स्वछ पाणी प्या आणि पिण्यापूर्वी कृपया 45 मिनिटे पाणी उकळवा.
११. अतिसारापासून बचाव करण्यासाठी सुधारित स्वच्छता सुविधांचा वापर करा.
1२. मुलांचे योग्य लसीकरण करा
15. योग्य व सकस आहार घेणे महत्वाचे आहे, त्यासाठी बाहेरचे खाणे टाळा.

पुरामुळे होणारे रोग, त्यांची कारणे आणि उपाय

1. लेप्टोस्पिरोसिस – 
२००५ च्या पूरात, लेप्टोस्पायरोसिस हा एक मोठा रोग पसरला होता, आणि बरेच लोक या आजारांना बळी पडले होते, या रोगाची लक्षणे त्वचेची घर्षणाचे डाग , त्वचेला  खाज सुटणे ही आहेत. दूषित माती, पाणी, मृत कुजलेले प्राणी यामुळे हा रोग पसरतो. अशा प्रकारचे लक्षणे आढळल्यास कृपया घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. हिपॅटायटीस ई –
हा मुख्यत्वे पूरपरिस्थितीमध्ये होणारा रोग आहे. हा रोग दूषित पाण्यामुळे होतो. जनावरांचा मैला, मेलेले प्राणी, कुजलेल्या वनस्पतीमुळे पाणी दूषित होते आणि  हिपॅटायटीस ई मानवी शरीरात प्रवेश करतो.
लक्षणे: कावीळ, भूक न लागणे, पोटदुखी, कोमलता, मळमळ, उलट्या, ताप अशी कोणत्याही प्रकारची  लक्षणे आढळल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. डेंग्यू –
बर्‍याच दिवसांपासून साचलेल्या डबक्यांमध्ये  डासांचा प्रादुर्भाव होतो. डासांमुळे डेंग्यू होतो जो एक धोकादायक रोग आह. वेळेवरती  योग्य उपचार न घेतल्यास रोग्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. नवीन जन्मलेल्या बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत डेंग्यूची लागण होऊ शकते.
लक्षणे: डोकेदुखी, ताप, रेट्रो-ऑर्बिटल वेदना, पुरळ, प्लेटलेटची कमी संख्या

घरगुती उपचार डेंग्यूपासून मुक्त होण्यास मदत करू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे लक्षणे आढळल्यास कृपया घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

“साथीच्या रोगांपासून आपला बचाव करण्यासाठी स्वच्छ व पाणी उकळून प्या ,अन्न ताजे व शिजवलेलं खा पुराच्या पाण्यात जाणे टाळा,अगदी गरजेच असेल तर सार्वजनिक ठिकाणी गमबुट, ग्लोज, घालून जा, मास्क वापरा आपली तब्येत जास्त बिघडते असे वाटत असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांचा चा वेळीच सल्ला घ्या.”
-डॉ. सायली सूर्यवंशी (M.B.B.S.)

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here