लाहोर : पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (पीएसएमए) साखर ७० रुपये प्रती किलो दराने विक्री करण्यास साफ नकार दिला आहे. साखर कारखानदार आणि पंजाब सरकार यांच्यामध्ये ७० रुपये प्रती किलो या दरावर सहमती होऊ शकली नाही. PSMA च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत साखर ७० रुपये प्रती किलो या दराने विक्री केली जाऊ शकत नाही.
ते म्हणाले की, साखरेचा इतका कमी दर हा पूर्ण उद्योगाला नष्ट करेल अशी भीती आम्हाला वाटते. सरकारने दोन मिलियन टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी विचार करायला हवा. देशातील गरजेपेक्षा अधिक साखर उत्पादन यंदा झाले आहे. ते म्हणाले की, सरकार १.५ मिलियन टन साखर निर्यात करण्यासाठी सुविधा देऊन १ बिलियन परकीय चलन कमवू शकते. यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शहबाज यांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींपासून सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी साखरेचा दर ७० रुपये प्रती किलो कमी करण्यास सांगितले होते. शरीफ कुटूंबाचे कारखाने खुल्या बाजारात ७० रुपये किलो दराने साखर उपलब्ध करतील अशी घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे.