ऊस थकबाकी जारी न केल्यामुळे नाराजी

फगवाडा: शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी फगवाडा चे नवनियुक्त एसडीसी अमित सरीन यांच्याबरोबर बैठक घेतली. बैठकीदरम्यान शेतकर्‍यांनी नवनियुक्त एसडीएम यांचे फगवाडा येथे पोेचल्यावर स्वागत केले. त्यांनी एसडीएम यांना ऊस थकबाकी न दिल्याने आणि साखर कारखान्यामध्ये येणार्‍या ट्रॉलीमुळे होत असणार्‍या ट्रॅफिक जॅमच्या समस्येबाबत विस्ताराने सांगितले.

शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, फगवाडामध्ये नवनियुक्त एसडीएम अमित सरीन यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी एसडीएम यांना साखर कारखान्यामध्ये ऊस घेवून येणार्‍या ट्रॉलिच्या समस्येबाबत विस्ताराने सांगितले. त्यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना साखर कारखान्यावर सात करोड रुपये देय आहे. एसडीएम यांनी आश्‍वासन दिले की, ते उस ट्रॉलीमुळे ट्रॅफिकच्या अडचणीबाबत लवकरच एसपी यांच्याशी चर्चा करुन समस्या सोडवतील. त्यांनी साखर कारखान्याचे व्यवस्थपकांच्या उपस्थितीमध्ये हा विश्‍वास दिला आहे, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, याबाबत पुढची बैठक 30 डिसेंबर ला होईल. साखर कारखाना व्यवस्थापनाकडून यावेंळी उसाचे पैसे तीन ते चार दिवसांच्या आत देण्याचा विश्‍वास दिला आहे. शेतकर्‍यांनी इशारा देताना सांगितले की, ऊसाची थकबाकी दिली नाही तर ते सरकार आणि साखर कारखाना व्यवस्थापकांविरोधात आंदोंलन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here