ऊस थकबाकी कमी दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून नाराजीचा सूर

शामली : डीएम जसजीत कौर यांनी जिल्ह्यातील साखर कारखाना आणि ऊस विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून ऊस थकबाकीचे परीक्षण करुन नाराजीचा सूर व्यक्त केला. डीएम म्हणाले, उशिरा थकबाकी भागविणाऱ्या कारखान्यां विरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी सभागृहात डीएम जसजीत सिंह कौर यांनी ही बैठक घेवून वर्ष 2019-20 च्या गाळप हंगामातील ऊस थकबाकीबाबत समीक्षा केली. डीसीओ विजय बहादुर सिंह यांनी सर्व कारखान्यांकडून खरेदी केलेला ऊस , पूर्ण हंगामामध्ये भागवलेले पैसे आणि देय असणारी रक्कम याबाबत माहिती दिली.अमर उजाला मधील बातमी नुसार, डीएम यांनी कारखान्यांकडून पूर्ण हंगामातील मात्र 29.70 टक्के ऊसाचे पैसे भागवण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.त्या म्हणाल्या , जिल्ह्यातील कारखान्यांवर शेतकर्‍यांचे ऊस मूल्य 838 करोड 24 लाख रुपये देय असणे हे गंभीर आहे. थकबाकी भागवण्यात कसूर करणार्‍या कारखान्यांविरोधात कारवाई केली जाईल. बैठकीमध्ये शामली कारखान्याच्या ट्रॅफिक जामचा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला. कारखान्याचे मुख्य ऑपरेरीटव अधिकारी आरबी खोखर यांनी अश्‍वासन दिले की, पुढच्या गाळप हंगामामध्ये कारखान्याची राख आणि ऊसाच्या ट्रॅफिक जाम समस्यांना दूर केले जाईल. त्यांनी शामली कारखान्याचे 30 जून पर्यंत 26 करोड रुपये, कारखान्याचे उस महाव्यवस्थापक अनिल अहलावत यांनी 21 करोड रुपये थानाभवन कारखान्याचे यूनिट हेड वीरपाल सिंह यांनी 42 करोड रुपये 30 जूनपर्यंत भागवण्याचे अश्‍वासन दिले आहे. बैठकीमध्ये ऊस विभागाच्या अधिकार्‍यांशिवाय लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शामली कैडी गावामध्ये किसान यूनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ऊस थकबाकी भागवण्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, प्रदेश सरकारकडून 14 दिवसांमध्ये शेतकर्‍यांची देय रक्कम भागवण्याची मागणी केली आहे. राजकुमार पप्पू यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. भारतीय किसान मजदूर संयुक्त यूनियन च्या मासिक बैठकीमध्ये शेतकर्‍यांचे पैसे भागवण्याची मागणी करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणधीर सिंह सल्फा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी राजवीर सिंह विद्रोही, योगेंद्र माजरा, शक्तिसिंह, ललिता रानी, रीना, रामेश्‍वर बधेव, ठाकूर संजय सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here