गेल्या गळीत हंगामातील ९८ टक्के थकबाकीचे वाटप: राज्य सरकार

108

लखनौ : सन २०१९-२० या गळीत हंगामातील ९८ टक्के ऊस थकबाकीचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सुमारे ३५२१७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. काॅंग्रेसचे आमदार नरेश सैनी यांनी शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील उसाचे पैसे न मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लवकरच उर्वरित ६८० कोटी रुपयांचे वाटप केले जाईल.

ऊस खरेदी आणि चालू गळीत हंगामात अद्याप पैसे न मिळाल्याबद्दल तसेच राज्य सल्लागार किंमत न वाढवल्याप्रश्नी विरोधी पक्षांनी भाजप सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. सैनी यांनी शेतकऱ्यांना चौदा दिवसांत पैसे न मिळाल्यास व्याजासह थकबाकी देण्याबाबत राज्य सरकारची काय भूमिका आहे अशी विचारणा केली. खासकरून गेल्या हंगामातील थकबाकीबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मंत्री राणा म्हणाले, सरकारच्या भूमिकेमुळे उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांत थकबाकीचे पैसे मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here