IFFCO तर्फे ऊसतोड मजुरांना ब्लॅकेट वाटप

कोल्हापूर : इफको (IFFCO) विभागीय कार्यालय गडहिंग्लजमार्फत कडगाव येथे ऊसतोड मजुरांना ब्लॅकेट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ‘गोडसाखर’चे माजी संचालक अनंत कुलकर्णी होते. यावेळी ऊसतोड मजुरांच्या ५० कुटुंबीयांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी धनंजय जामदार म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून अशा प्रकारचे उपक्रम इफकोमार्फत दरवर्षी राबवले जातात.

उसतोड कुटुंबांना मदत करून खारीचा वाटा उचलण्याचे काम इफको कंपनीच्या वतीने केले जाते, असे सांगितले. यावेळी राहुल कोळी, शिवाजी बेलेकर, महादेव चौगुले, धोंडिबा वांद्रे, संभाजी पाटील, शिवाजी चौगुले यांच्यासह ऊसतोड कामगार उपस्थित होते. कौशिक मुजुमदार यांनी स्वागत केले. तानाजी बेळेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here