दत्त-दालमिया कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना कंपोस्ट बेडचे वाटप

कोल्हापूर : दालमिया भारत फौंडेशनच्या ग्राम परिवर्तन प्रकल्पांतर्गत दरेवाडी (ता. पन्हाळा) येथे मोफत वर्मी कंपोस्ट बेडचे वाटप करण्यात आले. रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि घटत चाललेले उत्पन्न याचा विचार करून शेतकऱ्यांना कंपोस्ट खताचे बेड देण्यात आले. पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी सुदर्शन पाटील यांनी शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट बेड बसवण्यापासून खत तयार होईपर्यंतच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. वर्मी कंपोस्ट बेड वाटपावेळी उपस्थित दालमिया भारतचे युनिट हेड एस. रंगाप्रसादएचआर हेड सुहास गुडाळेप्रॉडक्शन हेड कनकसबाईमनिकंदनश्रीधर गोसावीऊस अधिकारी सरव्यवस्थापक संग्राम पाटीलशिवप्रसाद देसाईसहाय्यक व्यवस्थापक दालमिया भारत फाउंडेशनचे नितीन कुरळुपेप्रफुल्ल गायकवाडअभिजित मिस्त्रीशुभम साळोखेविष्णू गुरव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here