आमदार रोहित पवारांकडून मतदारसंघात साखर, धान्य आणि सॅनिटायझरचे वाटप

283

कर्जत: कोरोना मुळे लागू झालेल्या लॉक डाऊन मध्ये आमदार रोहीत पवार यांनी मतदारसंघातील गरीब आणि गरजूंना अन्नधान्य आणि सॅनिटायझरचे वाटप केले. शिवाय कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येक गावातून धूर फवारणी ही केली आहे.

याबरोबरच कर्जत-जामखेडसाठी जवळपास १५ ट्रक आटा आणि साखर दिली आहे. ‘कोरोनाशी लढूया’ ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी आमदार रोहीत पवार ही मोहीम राज्यभरातील कानाकोपऱ्यात नेत आहेत. यामुळे त्यांच्या मतदारसंघातील ३३ हजार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. ‘उपाशी पोटी कोणतीही लढाई लढली जाऊ शकत नाही असे ठामपणे सांगणाऱ्या आ.पवारांनी ही योजना कोणताही गाजावाजा न करता राबवली आहे.

जामखेड मध्ये अधिक कोरोना बाधित आढळल्याने शहराला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांची काळजी घेतली जात आहे. रुग्णांच्या संपर्कात राहून अलगीकरण केलेल्यांवरही लक्ष्य ठेवले जात आहे .

याशिवाय ५ ट्रक गहू व तुरडाळ, ४ ट्रक कांदा-बटाटा, मतदारसंघाच्या स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता. तसेच बारामतीऍग्रो च्या माध्यमातून राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांना ४५ हजार लिटरपेक्षा अधिक सॅनिटायझरचा पुरवठा केला. कर्जत-जामखेड येथे कोरोना वॉरीयर्सना मास्क, चष्मे, हँडग्लोज देऊन मतदारसंघातील गावांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. तशीच ती गरजेनुसार वाढवण्यात येणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here