‘गुरुदत्त’ कडून सॅनिटायझर चे वाटप

143

श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी व गुरूदत्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिरोळ प्रशासनाला गुरुदत्त चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या हस्ते सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक मा.माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ गुरूदत्त ‘ ने नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेला व प्रशासनाला नेहमीच मोलाची साथ दिली आहे. कोरोनो रोगाचा मुकाबला करण्यासाठी आज गुरूदत्त शुगर्स व गुरूदत्त चॅरिटेबल ट्रस्ट ने शिरोळ तहसिल कार्यालय, जयसिंगपूर उपविभागिय पोलिस कार्यालय, जयसिंगपूर व कुरुंदवाड पोलिस ठाणे, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड पत्रकार संघाला सॅनिटायझरचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकेची परपंरा सुरू ठेवली.

यावेळी तहसिलदार अपर्णा मोरे- धुमाक, पोलिस उपअधिक्षक किशोर काळे, पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर कुंभार, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज यादव,सामाजिक कार्यकत्ये स्वप्निल शहा उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here