विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दीपावली सणासाठी सर्व सभासदांना सवलतीच्या दरात ५० किलो साखर वाटप करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी टेंभुर्णी विभागातील सभासद शेतकऱ्यांना ओम साई मंगल कार्यालय येथे कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रभाकर कुटे व रमेश येवले-पाटील यांच्या हस्ते साखर वाटप झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती मस्तूद, बाजार समितीचे माजी संचालक राजाराम थोरात, विनोद देशमुख, बापूराव देशमुख, बळीराम नलवडे, चिटबॉय नितीन सलगर, समाधान कदम, संजय दळवी, रणजित देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here