गौतमबुद्धनगर (उत्तर प्रदेश) : खाद्यपदार्थांतील काळेबाजारी रोखण्यासाठी, तसेच कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये खाद्यपदार्थाच्या किंमती निश्चित केल्या आहेत.
29 मार्च रोजी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार गौतम बौद्ध नगरातील काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची कमाल किंमत निश्चित करण्यात अली आहे . 1 किलो मैद्याची कमाल किंमत 28-30 रुपये आणि एक किलो तांदळासाठी 30-35 रुपये आहे. 1 किलो मीठाचा दर 15-20 रुपये निश्चित करण्यात आला आहे, आणि एक किलो साखर 38-40 रुपये निश्चित केली आहे.
इतर अनेक खाद्यपदार्थाच्या किंमतीही निश्चित केल्या आहेत. डीएम कार्यालयाच्या सुचनेनुसार “कोणतीही व्यक्ती / दुकानदार ज्याचा उल्लेख केल्यापेक्षा त्या भावात खाद्यपदार्थांची वस्तू विक्री करताना आढळल्यास त्यांच्याविरूद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल.”
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.