ऊस बिलातील दिरंगाईमुळे मकसूदापूर साखर कारखान्याला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

शाहजहांपूर : जिल्ह्यातील २२ टक्के शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ऊस बिले देण्यात पिछाडीवर असलेल्या मकसूदापूर कारखान्याला जिल्ह्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. याशिवाय साखर कारखान्याच्या खात्यांवर लक्ष ठेवले आहे. जेवढी रक्कम बॅंक खात्यात जमा होईल ती शेतकऱ्यांना पाठवली जात आहे.

निगोही साखर कारखान्याने गळीत हंगामात ६२६२९ शेतकऱ्यांकडून १२९.९४ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता ‌ त्यापैकी ४१८.६१ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याने जून महिन्यात ९८ टक्के पैसे दिले आहेत. बुधवारी कारखान्याने पूर्ण पैसे दिले.

रोजा साखर कारखान्याने ९३ टक्के पैसे दिले आहेत. कारखान्याचे युनिट प्रमुख मुनेश पाल यांनी ३१ जुलैपर्यंत सर्व थकबाकी देण्याचे आश्वासन दिले आहे. पुवाया कारखान्याने ७० टक्के, तिलहर कारखान्याने ६६ टक्के, मकसूदापूर कारखान्याने २६ टक्के ऊस बिले दिली आहेत.

मकसुदापूर कारखान्याला ऊस बिले देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे आहेत. त्यांना नोटिसही बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यापैकी १.५४ लाख शेतकरी जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतात. उर्वरित शेतकरी फरीदपूर, लोणी, अजबापूर, रुपपुर कारखान्याकडे ऊस पाठवतात‌.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here