जाणून घ्या, कर्नाटकमध्ये कोणता जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर

858

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बेळगाव : चीनी मंडी

कर्नाटकमध्ये ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बेळगावने बाजी मारली आहे. यंदा आता पर्यंत जिल्ह्यात १ कोटी ७४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तसेच उताऱ्यामध्येही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उतारा ०.१० टक्क्यांनी वाढला आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र वाढले होते. यंदा फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात २४ साखर कारखान्यांमध्ये १ कोटी ५५ लाख टन ऊस गाळप झाले होते. त्यातून १ कोटी ७४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातील सरासरी उतारा ११.१७ होता. यंदा तो ११.२७ झाला आहे.

जिल्ह्यात दोन नवे साखर कारखाने सुरू झाल्यामळे कारखान्यांची संख्या २४ झाली आहे. त्यापैकी १८ साखर कारखान्यांमध्ये फेब्रुवारी अखेर ऊस गाळप थांबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ऊस क्षेत्रांमध्ये यंदा दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे निश्चितच गाळप वाढणार होते. गेल्या हंगामात १ कोटी ३७ लाख टन गाळप झाल होते. त्यातून एक कोटी ५२ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. यंदा फेब्रुवारी अखेर २१ लाख क्विंटल साखर उत्पादन जास्त झाले आहे. अजूनही जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या उत्पादनात आणखी साखरेची भर पडणार आहे.

कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक २४ साखर कारखाने आहेत. त्यानंतर बागलकोट, विजापूर आणि इतर जिल्ह्यातील मिळून ४४ कारखाने आहेत. बेळगाव जिल्ह्यापाठोपाठ बागलकोट जिल्ह्यात १ कोटी २ लाख क्विंटल, विजापूर जिल्ह्यात ४५ लाख ५४ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा कर्नाटकमध्ये ३ कोटी ९४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, एकूण ४ कोट २१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यात साखर उत्पादन वाढले, उतारा वाढला असला तरी, ऊस उत्पादकांची बिले मात्र थकीत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या टप्प्यातील बिले मिळाली आहेत. मात्र, त्यानंतरची बिले अद्याप थकीत आहेत. कारखान्यांनी उत्पादन जास्त केले. पण, ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत बिले देण्याचा नियम मात्र कोणी पाळला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते शशिकांत जोशी यांनी दिली आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here