बिहारला दिवाळी भेट, राज्यात १७ इथेनॉल युनिट, ३४०० कोटींची गुंतवणूक

74

लखनौ : बिहारमधील इथेनॉल उद्योगासाठी एक चांगली बातमी आहे. बिहारमध्ये आता किमान १७ इथेनॉल युनिट सुरू होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बिहारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

राज्यात इथेनॉलचा कोटा १८.५ कोटी लिटरवरून वाढून ३६ कोटी लिटर करण्यात आला आहे. जवळपास हा कोटा दुप्पट असेल. १७ युनिटमध्ये ३४०० कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. त्यातून अनेक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.

यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मोठे योगदान असल्याचे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. इथेनॉल पॉलिसी तयार करण्यासह ती केंद्राकडून मंजुरीच्या प्रक्रियेपर्यंतची माहिती त्यांनी दिली. दिल्लीत अमित शहा, पियूष गोयल, हरदिप सिंह पुरी आदींनी केलेली मदत मोलाची ठरली. मुख्यमंत्री शेतकरी पुत्र आहेत. ते शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल याची काळजी घेतात असे हुसेन म्हणाले.

मायक्रोमॅक्सचे फाउंडर आणि इथेनॉल उद्योगातील गुंतवणूकदार राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, बिहारमध्ये येण्यापूर्वी घाबरत होते. मात्र, इथे आल्यानंतर त्यांच्यातील भीती दूर झाली आहे. त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता नव्या इथेनॉल युनिट्स मुजफ्फरपूर, भोजपूर, पूर्णिया, बक्सर, बेगुसराय, मधुबनी, गोपालगंज, पूर्व चंपारण्य आणि भागलपूरमध्ये असेल. बिहारचा कोटा वाढविल्याबद्दल मंत्री हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना धन्यवाद दिले. आमच्याकडे ३०,३८२ कोटी रुपयांची प्रस्ताव आल्याचे ते म्हणाले. गुंतवणूकदारांना सर्व ती मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काही तासात लायसन्स आणि इतर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here