ऊस थकबाकी न भागवल्याने बुलंदशहर येथील साखर कारखान्याला डीएमनी दिली नोटीस

बुलंदशहर: गाळप हंगाम 2019-20 ऊस खरेदी संपल्यानंतरही वेव साखर कारखान्याने शेतकर्‍यांची थकबाकी अजूनही भागवलेली नाही. डीएम रविंद्र कुमार यांनी वेव साखर कारखान्याच्या जनरल मॅनेजर ना लवकरात लवकर ऊस थकबाकी न भागवल्याने शुगर केन कंट्रोल कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

डीएम रविंद्र कुमार यांनी वेव साखर कारखान्याच्या जनरल मॅनेजरना दिलेल्या नोटीसमध्ये पैसे लवकरात लवकर भागवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकर्‍यांना त्यांचे पैसे न दिल्याने नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की, पैसे न मिळाल्याने शेतकर्‍यांच्यात नाराजी आहे आणि शेतकरी संघटनांकडून प्रत्येक दिवशी धरणे आंदोलन केले जात आहे. अशामध्ये जिल्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागामध्ये बुलंदशहर ऊस थकबाकी भागवण्याच्या रँकिंग मध्ये प्रथम आले आहे. चारही साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामाचे 80.84 टक्के पैसे दिले आहेत. वेव शुगर कारखान्याने आतापर्यंत फक्त 51 टक्केच थकबाकी भागवली आहे. तर 2018-19ची करोडोंची थकबाकी वेव शुगर कारखान्याने 2019-20 मध्ये भागवली आहे.

जिल्हा ऊस अधिकारी डीके सैनी यांनी सांगितले की, प्रलंबित थकबाकीबाबत साखर कारखान्यांना ऊस विभागाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. लवकरच शेतकर्‍यांचे पैसे त्यांना दिले जावेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here