डॉक्टर बख्शीराम यांनी बदलवले उत्तरप्रदेशतील ऊस शेतकऱ्यांचे आयुष्य

बिजनौर : केवळ यूपी मध्येच नाही तर देशभरातील ऊस क्षेत्रामध्ये Co-0238 या उसाच्या वाणाने शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती सुधारलीच शिवाय ऊस क्षेत्रात क्रांती ही केली. Co-0238 ऊसाची लागवड पूर्वीप्रमाणे इतर ऊस प्रजातींच्या तुलनेत दुप्पट आहेत. प्रदेशात ऊसाची ही प्रजाती चांगली गाजत आहे. या प्रजातीचे जनक डॉक्टर बख्शीराम यांचे बिजनौर येथील कारखाना व्यवस्थापन आणि ऊस अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

खर तर, बिजनौर जिल्ह्याच्या उत्तम साखर कारखान्यात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. बख्शीराम यांचे दमदार स्वागत करण्यात आले. डॉ. बख्शीराम यांनी Co-0238 या ऊस प्रजातीचा शोध लावला. आजपर्यंत त्यांनी 25 पेक्षा अधिक ऊस प्रजाती तयार केल्या आहेत, पण जी कमाल 0238 या प्रजातीने केली आहे त्याला तोड नाही. सर्व देशात या प्रजातीच्या ऊसाची लागवड केली जात आहे.

या ऊसामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आहे आणि उत्पादनही अधिक आहे. या प्रजातीने शेतकऱ्यांच्या अर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. ऊस संशोधक डॉक्टर बख्शीराम, कोयम्बटूर ऊस संस्थानामध्ये काम करत आहेत आणि पहिल्यांदा जिल्हा दौऱ्यावर आले होते. डॉक्टरांनी उत्तम साखर कारखान्याच्या केन फार्म चेही बारकाईने निरीक्षण केले आणि ऊस Co-0238 च्या पीकांचे ही निरीक्षण केले. उत्तम साखर कारखाना पहिल्यांदाच ऊसाच्या बियांपासून उसाची रोपे तयार करत आहेत. या वर्षी १ करोड २ लाख रोपे तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here