साखर कारखानदारांच्या हटवादी भूमिकेने आंदोलन चिघळले : माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर : साखर कारखानदारांनी गेल्यावर्षीचे ४०० व चालू हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपयांची मागणी करण्यात आली. आंदोलन चिघळू नये यासाठी तीन पावले मागे येत मागील हंगामातील उसासाठी 400 ऐवजी 100 रुपयांची मागणी करत ऊसदराची कोंडी फोडावी, यासाठी प्रयत्न केले; मात्र कारखानदारांच्या अट्टहासापोटी आंदोलन चिघळले, आस आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे ऊस दरासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातवे येथील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंत पाटील होते. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी चर्चा करूनही पैसे न दिल्यामुळे आंदोलन तीव्र केले जाईल, असे त्यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी सर्व शेतकऱ्यांनी ऊसतोड थांबवून वाहने अडवून उसाची वाहतूक रोखावी. त्याखेरीज शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, असे सांगितले. शेट्टी म्हणाले की, जर आपण एकोपा नाही दाखवला, तर कारखानदार एकत्र येऊन आंदोलन मोडून काढण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, तालुक्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मार्चमध्ये येणाऱ्या उसाला बक्षीस योजना जाहीर केली आहे. मात्र ही योजना फसवी आहे. यावर्षी फेब्रुवारीअखेर ऊस शिल्लक राहणार नाही. मग मार्चमध्ये उसच शिल्लक नसल्यावर कसा पुरवठा करणार व शेतकऱ्याला बक्षीस कसे भेटणार, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी अमर पाटील, बाजीराव पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शेतकरी संघटना सातवे अध्यक्ष विजय सावंत, बबन पानसकर, वसंत वर्पे, दादा आंब्रे, धनाजी दळवी, रंगराव शिपुगडे, भाऊसो निकम, रमेश निकम, बळी चव्हाण, यश पाटील, आकाराम पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here