देशांतर्गत साखरेच्या बाजारात किमतीत सुधारणा होण्याची शक्यता

ऑगस्ट महिन्यात साखर विक्री कोट्याची घोषणा करण्यात आल्यानंतर देशांतर्गत साखरेच्या किमती ८० ते १०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढल्या आहेत. पवित्र हिंदू महिना श्रावणाची सुरुवात आणि रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी अशा आगामी सणांमुळे साखरेच्या किमतीमधील सुधारणा झाली आहे. २ ऑगस्ट २०२२ रोजी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जुलै महिन्याच्या साखर विक्री कोट्यासाठी ३० दिवसांच्या विस्ताराची घोषणा केली आहे. आणि बाजारातील जाणकारांच्या मतानुसार, या निर्णयानंतर साखरेच्या किमतीत ३० ते ४० रुपयांचे करेक्शन पाहण्यास दिसू शकेल. आगामी महिन्यातील सणासुदीतील मागणी लक्षात घेऊन दरात सुधारणा दिसू शकते असे व्यावसायिकांचे मत आहे.

National Cooperative Sugar Factories Federation चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाइकनवरे यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात झालेल्या जोरदार पावसामुळे साखरेच्या वाहतुकीत अडथळे येत असल्याने जुलै महिन्याच्या मासिक विक्री कोट्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ सरकारकडे मागितली होती. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत गतीने पावले उचलली. साखरेच्या किमती १०० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्या योग्य दिशेने आहेत. बाजारात योग्य वाढ दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील एखा खासगी कारखानदारांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या दोन दिवसांत साखरेच्या दरात गतीने वाढ झाली हा तात्पुरता टप्पा होता. बाजारात काही काळात किमान ५० रुपये प्रती क्विंटल दरात घसरण दिसू शकते असा दावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here