घरगुती, व्यावसायिक वापराच्या साखरेचा दर वेगवेगळा होणार

Image Credits: BBC Good Food

कोल्हापूर, 19 मे 2018 : केंद्र सरकार ग्राहकांना कमी दरात आणि शीतपिये, चॉकलेट, मिठाई तसेच या अनुषंगिक व्यवसायासाठी लागणाऱ्या साखरेच्या दरात वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानूसार देशातील ग्राहकांना लागणारी साखर आणि उद्योगासाठी लागणाऱ्या सारखेची माहिती संकलित केली जात आहे.

देशात ग्राहकांना आणि साखरेचा वापर करून विविध पदार्थ व शितपेय तयार करणाऱ्यांना एकाच दरात साखर विक्री केली जाते. साखर कमी किमंतीत घेवून शीतपेय, मिठाई, दूग्धजन्य पदार्थ, औषध, आईस्क्रिम, बिस्किट व बेकरीपदार्थांमध्ये वापरली जाते. देशातील सुमारे 70 टक्के साखर ही उद्योगासाठी वापरली जाते. उर्वरित 30 टक्के साखरेचा घरगुती वापर होतो. सध्या खुल्या बाजारात ३० ते ३३ रु. किलो प्रमाणे साखर विक्री होते. कमी किंमतीत साखर घेवूनही बाजारात साखरेपासून तयार केलेल्या पदार्थांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. हे पदार्थ घेण्याची सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे या घरगुती वापराव्यतिरिक्त उद्योगासाठी लागणारी साखर जास्त किंमतीने विक्री व्हावी, अशी मागणी देशातील सर्वच संघटनांकडून होत होती. यावर सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहेत.
घरगुती वापराच्या आणि उद्योगासाठी लागणाऱ्या साखरेची अचूक माहिती घेतली जाणर आहे. एक किलो साखरेपासून कोणत्या उत्पादनाला किती फायदा होतो. याचाही अभ्यास करूनच उद्योगाच्या साखरेचा दर ठरविला जाणार आहे. यामुळे, शेतकऱ्यांरी, ग्राहक आणि साखर कारखान्यांनाही फायदा होणार आहे.

2017-18 मधील साखर उत्पादनानूसार घरगुती, शीतपेयासाठी लागणारी साखर (लाख मेट्रिक टनामध्ये)

देशातील एकूण सारख उत्पादन : 310 मेट्रिक टन
शीतपेय, दूग्धजन्य पदार्थांसाठी लागणारी साखर : 217 लाख मेट्रिक टन
घरगुती वापरासाठी : 93 लाख मेट्रिक टन
केंद्र सरकार घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी लागणाऱ्या साखरेच्या दर वेगवेगळ करण्याबाबत विचार करत आहेत. त्यानूसार चर्चाही सुरू झाली आहे. लवकरच घरगुती आणि
व्यावसायिक कारणासाठी वापर होणाऱ्या साखरेचे दर वेगवेगळे असतील.
पाशा पटेल,
कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here