डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितले अमेरिकेच्या इतिहासात 2021 अर्थव्यवस्थेसाठी सर्वात चांगले वर्ष

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था लवकरच कोरोना वायरस च्या प्रभावातून बाहेर येईल. ट्रंप यांनी दावा केला की, 2021 देशाच्या इतिहासामध्ये अर्थव्यस्थेसाठी सर्वात चांगले वर्ष असेल.

राष्ट्रपती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन उमेदवार ट्रंप यांना डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जोए बाइडेन यांच्याकडून तगडे आव्हान आहे. राष्ट्रपती निवडणुक तीन नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीमध्ये कोविड 19 महामारी शी निपटण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि जातीय तणाव हे मुख्य मुद्दे आहेत.

ट्रंप यांनी एरिजोना मध्ये एका निवडणूक सभेला संबोंधित करताना सांगितले की, पुढचे वर्ष देशाच्या इतिहासामध्ये आर्थिक दृष्टीतून सर्वात चांगले राहील.
कोरोना वायरसमुळे अमेरिकेमध्ये 2,20,119 लोकांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेमध्ये 82 लाखापेक्षा अधिक संक्रमित आहेत. या महामारीमुळे अमेरिका मंदीच्या स्थितीमध्ये पोचला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये लोकांना रोजगार घालवावा लागत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here