सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत

114

मुंबई दिनांक १८: सैयदना बुरहानी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनी तर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

अनेक हातांनी झालेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत २५१ कोटी रुपये जमा झाले आहेत.

दाऊदी बोहरा समाजाच्यावतीने देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत ८ लाख ३३ हजार २४३ लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचेही ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करतांना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणुच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here