शेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती

56

गुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झाल्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती हाच आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेमधील इतर सर्व क्षेत्रांचे नुकसान झाले, त्या काळात कृषी क्षेत्रातील उत्पादने सलग दोन वर्षे वाढली आहेत अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, सर्व सरकारांनी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. आणि पिकांसाठी हमीभाव निश्चित करायला हवा. शेतकरी आणि सरकार यांदरम्यान नियमित संवाद असायला हवा. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडल्या जावू नयेत. जर त्यांची सांगड मतांशी घातली गेली तर नेहमी विभागणी होती. राजकारण केवळ राजकीय क्षेत्रापर्यंत मर्यादीत राहीले पाहिजे.

नायडू यांनी एका सभेत हरियाणातील प्रख्यात शेतकरी नेते सर छोटू राम यांच्या जीवन आणि लेखनावर आधारित पाच खंडांचे एकत्रित प्रकाशन केले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नायडू म्हणाले, लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी नवे विचार स्वीकारण्यासाठी तयार राहीले पाहिजे. शेतीचे आधुनिकीकरण करणे, ती अधिक टिकावू, फायदेशीर बनवणे याला सर्वोत्तम प्राधान्य देणे हे महत्त्वपूर्ण आहे.

दरम्यान, शेतकरी केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या तीन कृषी अधिनियमांविरोधात आंदोलन करीत आहेत. याबाबत शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या दरम्यान अनेकवेळा चर्चा झाली आहे. मात्र, त्यातून मार्ग निघालेला नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here