पंजाबच्या जनतेला दुप्पट दिलासा, आठवडाभरात पेट्रोल १६ रुपयांनी स्वस्त

30

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे देशभरासह पंजाबची जनताही हवालदिल झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये अबकारी कर घटवण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ निवडणूक असलेल्या राज्यांनी त्वरित व्हॅट कमी करुन जनतेला दिलासा दिला. अशा स्थितीत पंजाबवर नैतिक दबाव वाढला होता. येथेही निवडणुका होत आहेत.

मात्र आता चर्चेनंतर पंजाब सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल १० रुपये आणि डिझेलच्या दरात ५ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे पंजाबच्या जनतेला एका आठवड्यात पेट्रोलमध्ये किमान साडेपंधरा रुपये आणि डिझेलमध्ये साडेपंधरा रुपये स्वस्त मिळणार आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवर ५ रुपये कर कमी केला. तर पंजाब सरकारने व्हॅट १० रुपयांनी घटवला आहे. कें सरकारच्या तुलनेत पंजाब सरकारने दुप्पट दिलासा दिला आहे.

अमृतसरमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पेट्रोलची १११.३६ रुपये प्रती लिटर विक्री केली जात होती. केंद्र सरकारच्या कपातीनंतर ४ नोव्हेंबर रोजी हा दर ८९.३२ रुपये प्रती लिटर झाला. याचवेळी डिझेल ११.६३ रुपयांनी स्वस्त झाले. आता व्हॅट कमी केल्यानंतर पंजाबमध्ये ८ नोव्हेंबर रोजी डिझेल दर ८४.३२ रुपये होणार आहे. पंजाबच्या जनतेला एका आठवड्यात डिझेल १६.६३ रुपये स्वस्त मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here