डॉ.निलंगेकर कारखान्याचे पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : आ. संभाजी पाटील- निलंगेकर

लातूर : कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याने यंदा पाच लाख मे. टनापेक्षा अधिक गाळप करण्याचे उदिष्ट ठेवले आहे, असे आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ओंकार शुगर कारखान्याचा जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच कारखान्यात मराठवाड्यातील सर्वात मोठा डिस्टलरी प्रकल्प, त्याचबरोबर सीएनजी प्रकल्प व खत निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्याचा शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी मदत होईल. नोव्हेंबरमध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचा मानस असल्याचे आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रा. लि. अंबुलगा युनिट-२ च्या दुसऱ्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन माजी मंत्री, आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, जिल्ह्यातील कारखानदारीत असलेली मक्तेदारी अंबुलगा कारखान्यामुळे मोडीत निघत आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू होऊ नये म्हणून अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व अडचणींवर मात करीत अतिशय कमी कालावधीत निलंगेकर साखर कारखाना ओंकार शुगर लिमिटेडने व्यवस्थितरीत्या गेल्या वर्षी सुरू केला.

यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, दगडू सोळुंके, ॲड. सी. जे. सबनीस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, संजय दोरवे, संतोष वाघमारे, नरसिंग बिराजदार, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, गुंडेराव जाधव, मंगेश पाटील, काशिनाथ गरीबे, लालासाहेब देशमुख, शेषराव मंमाळे, सांगितले. बाळासाहेब शिंगाडे, सभापती पाटील आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here