देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ जुलै रोजी घेणार शपथ

35

नवी दिल्ली : देशाला नव्या राष्ट्रपती मिळाल्या आहेत. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी शानदार विजय मिळवला आहे. निवडणूक अधिकारी आणि राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी सांगितले की, एकूण ४७५४ मतदान झाले असून यापैकी २८२४ मते द्रौपदी मुर्मू यांना मिळाली. त्याचे मूल्य ६७६८०३ आहे. २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू १५ व्या राष्ट्रपतीच्या रुपात शपथ ग्रहण करतील. राष्ट्रपती निवडणुकीच्या आतापर्यंतच्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांना एकूण वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली आहेत. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोवींद, पंतप्रधान मोदी, विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होत आहे. नव्या राष्ट्रपतींची निवडणूक १८ जुलै रोजी मतदानाने झाली. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आमि विरोधी गटाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यातील या लढतीपूर्वी एनडीएससह अनेक पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. यासोबतच त्यांनी अनेक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. त्या आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्म होवून सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आहेत. याशिवाय त्या सर्वात युवा राष्ट्रपती आहेत. त्यांनी २०१५ ते २०२१ पर्यंत झारखंडच्या नवव्या राज्यपालपदी काम केले आहे. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. राष्ट्रपती बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. यापूर्वी २००७ मध्ये प्रतीभा देविंसिंह पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यातून आलेल्या मुर्मू यांचे राजकीय करिअर १९९७ मध्ये सुरू झाले होते. ओडिसातील बीडेपी, बीजी जनता दल आघाडीच्या सरकारमध्ये त्या मंत्रीही होत्या. त्यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. त्यांच्या पती आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून मुलगी विवाहित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here