ठिबक सिंचनामुळे पाणी बचतीसह उत्पादनात वाढ शक्य

मुझफ्फरनगर : जिल्ह्यात उसाचे पीक मुख्य आहे. त्यासाठी पाण्याचा अधिक वापर होतो. पाण्याच्या बचतीसाठी शासनाकडून ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे. ऊस विभागाच्या सहकार्याने उद्यान विभागाने ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना ८० ते ९० टक्के अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. या वर्षी जिल्ह्यात १५५९ हेक्टर क्षेत्रात ठिबक सिंचनाचे उद्दीष्ट आहे. त्यातून पाणी बचत होईल. शिवाय उत्पादनातही वाढ होऊ शकते. शेतांमध्ये तसेच बागांमध्ये पाटाने दिले जाणारे पाणी ६० टक्के वाया जाते. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ठिबक सिंचनावर भर दिला जात आहे. उद्यान विभागाला जिल्ह्यात १५७९ हेक्टर क्षेत्रफळ ठिबकचे उद्दीष्ट आहे. यासाठी दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळेल. तर उर्वरीत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान दिले जाईल. अशा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये अनुदान जमा केले जामार आहे. ठिबक सिंचनाने पाण्याच्या बचतीसह कामगारांचा खर्च तसेच किटकनाशकांचा खर्चही कमी होतो. उत्पादन वाढीसह गुणवत्ता वाढते.

याबाबत जिल्हा उद्यान अधिकारी सुरेंद्र सिंह मान म्हणाले, गेल्यावर्षी ३२९.१ हेक्टरमध्ये ठिबक सिंचन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना ३.११ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. आता यंदासाठी १५७९ हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट दिले आहे. तर १०० हेक्टरमध्ये ड्रीप इरिगेशन पूर्ण करण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here