महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी ठिबक सिंचनावर भर

मुंबई : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी बजेट सादर करताना सांगितले की, राज्यामध्ये पुढच्या चार वर्षामध्ये ऊसाच्या शेतीसाठी ठिबक सिंचनावर भर देण्यात येणार आहे आणि यामध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज कमी करण्यात येणार आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री जल संरक्षण योजना सुरु केली जात आहे, आणि यासाठी 2000 करोड़ रुपये जल आणि मृदा संरक्षण विभागासाठी पुरवण्यात आले आहेत. पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी 5,000 सौर कृषि पंपाची योजना आखली आहे. यासाठी 670 करोड़ रुपये निधी वाटप करण्यात आले आहे.

शुक्रवारी विधान सभेमध्ये महा विकास आघाड़ीचे पहिले बजेट सादर करताना, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याचा आरोप केला. तसेच लहान शेतकऱ्यांना नुकसानीतून वर येण्यासाठी अर्थिक मदत जाहीर झाली नसल्याचा, दावा ही त्यांनी केला.

पवार म्हणाले, केंद्र सरकार ने गेल्या वर्षाच्या पूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अर्थिक सहाय्य मंजूर केले नाही. केंद्र सरकारने केवळ 956 करोड़ रुपये मंजूर केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here