ड्रीप इरिगेशनमुळे शेतकरी खुश, ऊस उत्पादन वाढणार

महराजगंज : पाणी आणि पैसे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाही ड्रीप इरिगेशन युनिट मिळणार आहे. पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रीप इरिगेशनमधून शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अर्ज करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाणार नाही असे ऊस विभागाने सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात ऊस विभागाने १६५ हेक्टर क्षेत्रफळात ड्रीप इरिगेशनचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

जिल्ह्यात पाणी बचतीसाठी तसेच अधिक ऊस उत्पादनासाठी ड्रीप इरिशेगन तंत्राचा अधिक वापर केला जात आहे. ऊस पिकासाठी अधिक पाण्याची गरज भासते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. ड्रीप इरिगेशनपासून ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होईल. ड्रीप एरिगेशनमुळे एकूण खर्चात २० टक्क्यांची बचत होते. ड्रीपमधून खते देण्याच्या प्रक्रियेने एकूण खत वापरातही ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ऊस विभागाने गेल्या वर्षी बाराहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ड्रीपच्या माध्यमातून शेती केली. यावर्षीही छोटे, अल्प भूधारक आणि मोठ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सिंचन योजनेशी जोडले जाणार आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. शेतकरी पाटाने पाणी देतात. मात्र, त्यातील बहुतांश पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच जमिनीत जाणाऱ्या पाण्याचा पिकाला लाभ होत नाही. ड्रीपच्या माध्यमातून थेट उसाा पाणी देता येते. ड्रीप बसविण्यासाठी सरकार ८० टक्के अनुदान देणार आहे. तर अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान दिले जाईल. चालू आर्थिक वर्षात १६५ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचा शेतीसाठीचा खर्च कमी होईल आणि शेतकरी खुश होतील असे जिल्हा ऊस अधिकारी जगदीश यादव यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here