ड्रोनद्वारे एका एकरातील ऊसावर सहा मिनिटांत फवारणी

मुझफ्फरनगर : साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे विशेष सचिव आयएएस डॉ. रुपेश कुमार यांनी नावला गावात ड्रोनच्या माध्यमातून ऊसावर केल्या जाणाऱ्या नॅनो युरिया व किटकनाशक रसायनाच्या फवारणीची पाहणी केली. एक एकर क्षेत्रातील उसावर अवघ्या सहा मिनिटांत फवारणी पूर्ण होत असल्याचे यावेळी आढळून आले.

मन्सूरपूर साखर कारखान्याच्यावतीने नावला गावातील शेतकरी अब्दूल करीम यांच्या शेतातील ऊसावर नॅनो युरिया आणि किटकनाशक रसायनाची फवारणी करण्यात येत आहे. ही फवारणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली. ही नॅनो युरीया, किटकनाशकाची फवारणी पाहण्यासाठी सहारनपूर गावातील ऊस विकास विभागाचे नोडल अधिकारी डॉ. रुपेश कुमार उपस्थित होते. यावेळी एक एकर क्षेत्रातील ऊसावर साधारणपणे सहा मिनिटांत फवारणी करण्यात आली. हे प्रात्यक्षिक तीव्र ड्रोन कंपनीच्यावतीने विकास कुमार, रमण आणि अश्विनी या पथकाने केले. या ड्रोनची पाणी टाकी क्षमता १० लिटर आहे. एक एकर उसासाठी ही क्षमता पुरेशी आहे. ड्रोन कंपनीच्या प्रतिनिधींनी याची किंमत ६.५ लाख रुपये असल्याचे सांगितले. बॅटरीचे पास सेट कंपनीकडून दिले जातात.

ड्रोन कंपनीकडून प्रती एकर ३७५ रुपये आकारले जात आहेत. नॅनो युरिया व किटकनाशकाची व्यवस्था शेतकऱ्याने करायची आहे. यातून कामगारांचीही बचत होईल. जमिनीचे आणि वातावरणातील प्रदूषणही कमी होत असल्याचे दिसून आले. यावेळी ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, शेतकरी सुधीर त्यागी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रुपेश कुमार यांनी बडकली गावातील अनुराधा त्यागी यांच्या शेतातील ऊस नर्सरीचीही पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here