उत्तर प्रदेशमध्ये ऊस शेतीत वाढतोय ड्रोनचा वापर

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये ऊस शेतीसाठी ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत आहे. डीएसएम साखर कारखाना असमोलीद्वारे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणीस सुरुवात करण्यात आली. जिल्हा ऊस अधिकारी कुलदीप सिंह यांनी ड्रोन सुरू करून या उपक्रमास सुरुवात केली.

हिंदुस्तान मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी कुलदिप सिंह यांनी सांगितले की, ड्रोनमधून एकावेळी १० ते १२ लिटर पाणी वाहून नेले जाते. एकदा चार्जिंग केल्यानंतर तीन एकर क्षेत्रावर फवारणी केली जावू शकते. कामगार तुटवड्याची समस्या पाहता ड्रोन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ऊसावर टॉप बोरर किडीचा फैलाव रोखण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी सुरू आहे. डीएसएम साकर कारखान्याप्रमाणे राज्यातील इतर कारखानेही ड्रोनचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here