टोळांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी केला जात आहे ड्रोन चा वापर

166

आगरा: कृषी विभागाचे सहायक निदेशक एसएन सिंह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात टोळांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे, ज्यानंतर 60 टक्के टोळांचा नाश झाला आहे. सिंह म्हणाले, ड्रोन च्या माध्यमातून कीटकनाशकाच्या फवारणीमुळे जवळपास 60 टक्के टोळ मारले गेले. केंद्र सरकारकडून दिलेल्या चार ड्रोन चा कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापर केला जात आहे.

जिल्हा कृषी रक्षा अधिकारी रामपर्वत कुमार यांनी सांगितले की, टोळांची झुंड सोमवारी सायंकाळी जवळपास 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान इथे आली. आम्ही इथे फवारणीसाठी ट्रॅक्टर आणि फायर ब्रिगेड चा वापर केला. आता केंद्र सरकारकडून एक पथकही टोळांना मारण्यासाठी चार ड्रोन सह घटनास्थळी पोचले. एक रहिवासी निहाल सिंह जे फिरण्यासाठी जात होते, त्यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने टोळांची झुंड सकाळी सकाळी समोर आली आणि स्थानिक लोकांसाठी चालणेही कठीण झाले. कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, टोळांच्या झुंडीने सर्व समूहांना राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश च्या राज्य कृषी विभाग, स्थानिक प्रशासन आणि केंद्रीय टोळ इशारा संघटनेच्या अधिकार्‍यांच्या पथकांद्वारा ट्रॅक केले जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here