दुष्काळामुळे उत्पादनात घट : इंडोनेशियाने शेतकर्‍यांना भात लावण्यासाठी मदतीला सैन्याला बोलावले

जकार्ता : आग्नेय आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात तीव्र दुष्काळामुळे तांदूळ उत्पादनात घट झाली आहे. किमती वाढल्या आहेत. आयातीत वाढ करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे, म्हणून इंडोनेशियाने लष्कराला शेतकऱ्यांना भात लागवड करण्यास मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

 

एल निनोमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पेरण्या खोलाम्ब्ल्या आहेत. आता झालेल्या पावसाचा फायदा घेण्यासाठी आणि वेळेत पेरणी उरकण्यासाठी अध्यक्ष जोको विडोडो यांनी लष्करी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची मदत करण्यास सांगितले आहे.

 

विडोडो यांनी सांगितले की, काही प्रांतांमध्ये पाऊस पडत असल्याने आम्ही शेतकऱ्यांना भात लागवड करण्यास सांगितले आहे. अल निनोमुळे उशीर झाला आहे, पण आम्हाला ताबडतोब पेरणी उरकायची आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here