दुबईची अल खलीज शुगर करणार इंडोनेशीयातील साखर कारखान्यात गुंतवणूक

283

जकार्ता : दुबईस्थित अल खलीज शुगर कंपनीने (एकेएस) इंडोनेशियात साखर कारखाना आणि त्याच्या पूरक सुविधा विकसित करण्यासाठी २ बिलियन अमेरिकन डॉलर (Rp 26.66 ट्रिलियन) गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. स्थानिक प्रसार माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. या प्रस्तावामुळे देशातील साखरेच्या पुरवठ्यातील तूट भरून काढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे.

यासंदर्भात Thejakartapost.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उद्योगमंत्री अगुस गुमीवांग कार्तसस्मिता यांनी सांगितले की, अल खलीज शुगर कंपनीचे कार्यकारी संचालक जमाल अल-घुरैर यांनी २ नोव्हेंबर रोजी दुबईत झालेल्या आपल्यासोबतच्या बैठकीत साखर उद्योगातील गुंतवणुकीविषयी घोषणा केली होती. त्यासंदर्भातील प्रक्रीया आता सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here