अतिवृष्टीने लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याच्या गोदामाचे पत्रे उडाले, साखर भिजल्याने नुकसान

बीड : तेलगावसह परिसरात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याला बसला आहे. कारखान्याच्या साखरेच्या गोडाऊनवरील पत्रे उडून गेल्याने साखर भिजली आहे. तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले. कारखाना अंतर्गत असलेली विज वाहिणीचे पोलही वाऱ्यामुळे अनेक पोल पडले तर अनेक पोल तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. कारखान्याचे सुमारे तीन ते चार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी दुपारी तेलगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपिटीने उन्हाळी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. वादळाने झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल कोलमडून वीज पुरवठा खंडित झाला. लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोडाऊनवरील पत्रे हवेत उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी पडून साखर भिजली आहे. विजेचे पोल मोडले आहेत. याशिवाय, कारखान्याच्या आमराईतील आंब्याची झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली. कारखान्यास पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनचे खांबही मोडले आहेत. अतिवृष्टीत कारखान्याचे तीन ते चार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here