पाण्याअभावी ऊस वाळू लागला, शेतकऱ्यांपुढे संकट

सातारा : जिल्ह्यात मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने यंदा पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पाणी टंचाईचे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. पाणी नसल्याने आता उसाचे पीक वाळू लागले आहे. त्यामुळे पिके जगवताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे. भाजीपाल्याच्या पिकासह नगदी पिकांनाही पाणी टंचाईची झळ बसली आहे. उसासारखे पीकही पाणी नसल्याने वाळू लागले आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.ऊस पीक जगवायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. या उष्णतेच्या लाटेत शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. ग्रामीण भागात यावर्षी सर्वाधिक उष्ण तापमान असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे. शेतकऱ्याला शेतात काम करताना उष्णतेचा मोठा त्रास होऊ लागल्याने शेतकरी सकाळीच आपली कामे उरकून घेत आहेत. पुढील काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास किंवा पाणी उपलब्ध न झाल्यास उसाचे पीक वाळताना बघण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहणार नाही, अशी परिस्थिती तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here