सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंता ग्रस्त

यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कर्नाटक जिल्ह्यातील भातशेतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कूर्ग परिसरात भातशेतीवर अवलंबून असणारे अनेक शेतकरी यावर्षीच्या कमजोर मान्सूनमुळे चिंतीत झाले आहेत. मागच्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुबलक पाणी होते पण यावेळी परिसरातील नद्या नाले अजूनही न भरल्याने भाताच्या रोपांची लावणी कशी करायची? हा प्रश्नच आहे.

कावेरी व लक्ष्मणतीर्थ नद्यांतही म्हणावे तसे पाणी नाही मात्र लावणीला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापेक्षा जास्त उशीर करता येत नसल्याने या खेपेस भातपिकांचा परतावा घटण्याची चिन्हे आहेत. इतर छोट्या मोठ्या शेतीसाठी पाणीसाठा आहे, मात्र भाताला लावणीवेळी मुबलक पाणी लागते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कुट्टा, श्रीमंगला, शेट्टीगिरी, मुरनाडू, भागमंगला अशा सर्वच तालुक्यांत पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा फार कमी आहे. अबे, मलाली आणि इरपू येथील धबधबे एरवी जुलैमध्ये पर्यटकांचे आकर्षण असतात पण यावर्षी धबधब्यांत अजूनही पाणी नसल्याने पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here