कारखाने सुरू होण्यास उशीरामुळे शेतकऱ्यांचा नाईलाज, ऊस चालला गुऱ्हाळांकडे

मेरठ : पावसामुळे साखर कारखाने सुरू होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. एकीकडे दिवाळी सणाची तयारी आणि दुसरीकडे गव्हाच्या पेरणीसाठी शेतही रिकामे करायचे आहे अशी अडचणीची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस नाईलाजाने गुऱ्हाळांकडे (क्रशर) वळवावा लागत आहे. क्रशरवर ऊसाला प्रती क्विंटल १०० ते १२५ रुपये कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गहू आणि बटाट्याची लागवड करण्यासाठी शेत लवकर रिकामे करण्याची घाई आहे. मात्र, पावसामुळे साखर कारखाने चालविण्यात उशीर होत आहे. ऊस तोडणीत जसजसा उशीर होईल, तसतसा रब्बीच्या पिकांच्या लागवडीत उशीर होत जातो. साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बटाट्याची लागवड केली जाते.
मेरठ विभागातील भूडरबाल गावातील शेतकरी मनोज कुमार यांनी सांगितले की, दिवाळी सणासाठी आम्हाला पैशांची गरज आहे. त्यांनी त्यांचा ऊस क्रशरला पाठवला आहे. सध्या क्रशरमध्ये २२५ ते २५० रुपये प्रती क्विंटल दर आहे. त्यामुळे प्रती क्विंटल १०० ते १२५ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here