रुपयामुळे डॉलरची चमक होणार कमी, स्थानिक चलनात व्यवसाय करण्यासाठी १८ देशांशी करार

नवी दिल्ली : भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन बनण्याच्या मार्गावर गतीने पुढे जात आहे. कारण जगातील अनेक बडे देश भारतासोबत रुपयामध्ये व्यवहार करण्यात रुची दाखवत आहेत. रुपयामध्ये इतर देशांशी भारताचा व्यवसाय सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीनेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच आतापर्यंत १८ देशांनी ६० स्पेशल रुपया वोस्ट्रो अकाउंट उघडले आहेत. यामध्ये रशिया आणि श्रीलंकेसारख्या देशांचा समावेश आहे.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसरा, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत सांगितले की, आरबीआयकडून देशांतर्गत आणि परदेशी बँकांमध्ये रुपयात व्यवहार करण्यासाठी १८ देशांच्या ६० स्पेशल वोस्ट्रो अकाउंट उघडण्यासाठी मंजुरी दिली आहे. मंत्री म्हणाले की, ज्या १८ देशांनी भारतामध्ये स्पेशल रुपया वोस्ट्रो अकाउंट उघडले आहेत, त्यापैकी रशिया स्थानिक चलनात व्यापार करण्यासाठी खूप लवकर तयार नव्हता. भारत नेहमीच रुपयात निर्यातीसाठी समर्थन करीत आहे. वोस्ट्रो अकाउंट उघडणाऱ्या देशांमध्ये रशिया, सिंगापुर, श्रीलंका, बोत्सवाना, फिजी, जर्मनी, गयाना, इस्त्राइल, केनिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्युझीलंड, ओमान, सेशेल्स, टांझानिया, युगांडा आणि युनायटेड किंगडमचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here