ह्या कारणांमुळे साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर टाकला बहिष्कार

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बाजपुर: सरकारी आश्वासने आणि इतर मागण्या तसेच वेतन न  मिळाल्यामुळे  साखर कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. जर पैसे दिले नाहीत तर मतदान नाही असे बॅनर लावून येणाऱ्या  लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घोषित केला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नसल्यामुळे साखर कारखाना कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत.  एवढेच नाही तर गेल्या २ वर्षांपासूनचा एरियर चा परतावा, मागच्या वर्षीचा बोनस, दोन वर्षीच्या सुट्टीचे पैसेही  दिले गेले नाहीत. सरकारवर नाराजी दाखवण्यासाठी गुरुवारी कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घोषित केला आणि झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्याचे प्रयत्न केले .

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे कि निवडणुकींवरचा बहिष्कार म्हणजे असे नाही कि ते कारखान्यात काम करणार नाहीत. तसेच त्यांनी हे नमूद केले कि त्यांच्या मागण्या अधिकृत आहेत आणि सरकार आणि अधिकाऱ्यांनी त्यावरती लक्ष देणे गरजेचे आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here