ऊसाची लवकर पक्व होणारी अधिक शर्करायुक्त प्रजाती विकसीत

134

हिस्सार: चौधरी चरण सिंह कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधकांनी उसाची प्रगत सीओएच १६० ही प्रजाती विकसित केली आहे. राज्यातील साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी ही प्रजाती वरदान ठरणार आहे. ही जात लवकर पक्व होणारी आणि उच्च शर्करायुक्त आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीत ही जात अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. या जातीला विद्यापीठाच्या विभागीय संशोधन केंद्र उचानी कर्नालच्या संशोधकांनी विकसित केले आहे. या जातीला केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या पीक मानके अधिसूचना समितीने नवी दिल्लीत आयोजित ८६ व्या बैठकीत हरियाणा राज्यासाठी मंजुरी दिली आहे.

उसाच्या या जातीमुळे अधिक साखर आणि ऊस लवकर पक्व होण्याची साखर उद्योगाची मागणी पूर्ण होऊ शकेल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. आर. कंबोज यांनी सांगितले की राज्यातील साखर उद्योगाला कमी कालावधीत तयार होणारी जात गरजेची आहे. यामध्ये लाल सड रोग आणि इतर किटकांविरोधातील रोगप्रतिकारक क्षमता अधिक असण्याची गरज आहे. यापूर्वी प्रचलीत असलेली सीओ ०२३८ ही जात लाल सड रोगासह इतर रोगांच्या प्रादुर्भावाबाबत संवेदनशील बनली आहे. त्यामुळे सीओएच १६० प्रजाती शेतकऱ्यांची गरज आणि साखर उद्योगाची मागणी लक्षात ठेवून विकसीत केली आहे. सद्यस्थितीत ही उत्तम आहे. राज्यातील ०२३८ प्रजातीऐवजी तिचा वापर होईल.

सीओएच १६० या प्रजातीचा ऊसाचा आकार मध्यम आणि मोठा असतो. त्याची पाने गडद हिरवी असतात. या प्रजातीचे उत्पादन ८३८ क्विंटल प्रती हेक्टर नोंदण्यात आले आहे. हा ऊस कितीही पाऊस असला तरी कोसळत नाही. या साखरेचा उतारा ११.३६ टन असा आहे. हंगामी आणि पूर्वहंगामी अशा दोन्ही काळात या उसाची लागण करता येते. इतर प्रजातींच्या तुलनेत या उसामध्ये एनपीकेचे प्रमाण २५ टक्के वाढवता येते. त्यातून उत्पादन वाढीला बळ मिळते. ही प्रजाती विकसित करताना डॉ. ए. एस. मेहला, डॉ. एस. पी. कादियान आणि डॉ. एम. सी कंबोज आदींसह डॉ. एच. एल. सेहतिया, डॉ. राकेश मेहरा, डॉ. समर सिंह, डॉ. विजय कुमार, डॉ. मेहर चंद, डॉ. रण सिंह आणि डॉ. सरोज जयपाल सहभागी होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here