पूर्व ते पश्चिम : पावसाने विद्ध्वंस, आसाममध्ये पूरस्थिती बिकट

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक राज्यांतील स्थिती बिकट बनली आहे. एकीकडे आसाममध्ये पुराने थैमान घातले आहे. पुर्ण आसाम बुडाले आहे. सैन्यदल, एनडीआरएफकडून मदत व बचावकार्य केले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पावसाने थैमान घातले आहे. इथे पाण्याचा वेग इतका मोठा आहे की, उभे राहणे मुश्किल झाले आहे. गाड्या वाहून गेल्या आहेत.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, आसाममध्ये आस्मानी संकटाने परिस्थिती गंभीर बनले आहे. अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत. मदत आणि बचावकार्य सैन्यदलाच्या हाती देण्यात आले आहे. रस्त्यांवर अक्षरशः तलावाची स्थिती आहे. चिरांग परिसरात पाण्याच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना जवानांनी बाहेर काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आसामच्या बहुतांश जिल्ह्यांत अशीच परिस्थिती आहे. बोंगईगावात घरांमध्ये पाणी घुसले आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांना नागावमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करून मदतकार्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जोरदार पावसाने थैमान घातल्याचे दिसून येत आहे. अनेक गाड्या वाहून गेल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here