राजारामबापू कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी : मार्शिओ सिल्वा

सांगली : राजारामबापू कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली, शेकडो लोकांना रोजगार मिळाला आणि त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास झाला, असे मत ब्राझीलचे मार्शिओ सिल्वा यांनी व्यक्त केले. सिल्वा हे ब्राझील येथील चेन्स दा ब्राझील या कंपनीचे प्रकल्प संचालक असून त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट देवून गाळपास आलेला ऊस अधिक स्वच्छ करणारी यंत्रणा उभारणीबाबत चर्चा केली.

सिल्वा म्हणाले, गाळपास आलेल्या उसाचा पालापाचोळा व ऊसाबरोबर आलेली माती स्वच्छ करणारी यंत्रणा उभा केल्यास त्याचा कारखान्यास अधिक फायदा होऊ शकतो. यावेळी त्यांनी या विषयाचे सादरीकरण करुन संचालक व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

डॉ. आर. बी. डौले म्हणाले, राजारामबापू साखर उद्योग समूहाने केवळ साखर उत्पादन केले नाही तर, शेतकऱ्याला श्रीमंत केले. या भागाचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणला आहे. राजारामबापू साखर उद्योगाने गाळपास येणारा ऊस स्वच्छ करण्याची यंत्रणा उभा केल्यास तो पथदर्शी प्रकल्प ठरेल. यावेळी उपाध्यक्ष विजयराव पाटील, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे, राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे (दिल्ली) ऊस विशेषतज्ज्ञ डॉ. आर. बी. डौले, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, संचालक बाळासाहेब पवार, देवराज पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सुनील सावंत, संभाजी सावंत, उमेश शेटे, धैर्यशील पाटील, महेश पाटील, राजेश पाटील, विश्वनाथ पाटसुते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here