एनएसआयमध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळणार, प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू

कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटद्वारे संचलित विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी प्रवेशाच्या कार्यक्रमांना अंतिम रूप देण्यात येत आहे. शुगर टेक्नॉलॉजी, शुगर इंजिनीअरिंग, वाईन टेक्नॉलॉजी, शुगरकेन प्रॉडक्टिव्हिटी, क्वालिटी कंट्रोल अँड एन्व्हायर्नमेंटल सायन्स, इंडस्ट्रियल इक्विपमेंट आणि इतर संबंधित बारा अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन परीक्षा देशातील पंधरा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही केंद्रे कानपूर, नवी दिल्ली, पुणे, चेन्नई, कोलकाता, डेहराडून, इंदौर, मेरठ, गोरखपूर, चंदीगढ आणि पाटणा येथील आहेत. एनएसआयचे शिक्षण प्रमुख अशोक गर्ग यांनी सांगितले की, तीन फेलोशिप, सहा पदव्युत्तर पदविका आणि तीन प्रमाणपत्र स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये भारतीय आणि परदेशी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू होईल.

त्यांनी सांगितले की, परदेशी श्रेणीतील उमेदवारांचा प्रवेश त्यांच्या शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या निकषानुसार असेल. आणि त्यांना परीक्षेसह सहभागी हो्याची गरज नाही. आधीच अनेक साखर उत्पादक देशांनी या अभ्यासक्रमासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या नामांकनाविषयी चर्चा केली होती. फिजीचे साखर उद्योग मंत्री चरण जीत सिंह यांनी आपल्या भारत दौऱ्यावेळी एनएसआयचे प्राध्यापक संचालक नरेंद्र मोहन यांच्यासोबत या मुद्यांवर चर्चा केली होती. प्रोफेसर मोहन यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक परदेशी प्रतिनिधींनी संस्थेचा दौरा केला होता. आणि इंडोनेशिया, फिलिपाइन्स, नायजेरिया, टांझानिया यांसारख्या देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची मागणी केली होती. देशातील साखर उद्योग चांगली कामगिरी करीत आहे आणि खास करुन इथेनॉल उत्पादन निर्मिती क्षेत्रात अनेक उपाय केले जात आहेत. ते म्हणाले की, रोजगार निर्मितीच्या पुरेशा संधी आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमांतून १०० टक्के प्लेसमेंट मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here