ऊसतोडणी मजूर नसल्यामुळे साखर कारखान्याच्या गाळपावर परिणाम


पुणे :
कोरोना वायरसचा प्रसार थांबावा म्हणून देशात 21 दिवसाचा राष्ट्रव्यापी लॉकडाउन करण्यात आला. याचा परिणाम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या गाळपावर होउ शकतो. कारण काही ऊस  तोडणी कामगार घरी परत आले आहेत. सध्या राज्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे.

राज्यात ऊस शेतकरी ऊस तोडणी कामगारांच्या गैरहजेरीमुळे आपले पीक कारखान्यात पाठवण्यासाठी असमर्थ आहेत.
महाराष्ट्राचे साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले की, उरलेला ऊस लवकरात लवकर तोडून कारखान्यात पाठवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. ऊस तोडणी कामगारांचा एक गट कोरोना वायरस महामारी पासून वाचण्यासाठी आपल्या गावाकडे गेला आहे. लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर मजूरांनी आपले ठिकाण सोडू नये आणि तिथेच त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश कारखान्यांना  देण्यात आले आहेत

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here