साखर कारखान्यांना तोट्यातून सावरण्यासाठी प्रभावी धोरण तयार केले जात आहे

कैथल (हरियाणा) : हरियाणा सरकार ,राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना तोट्यातुन वर काढण्यासाठी नवे प्रभावशाली धोरण बनवले जात आहे, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येईल.

सहकारी साखर कारखान्याला हरियाणा शुगर फेडरेषन चे व्यवस्थापकीय संचालक कैप्टन शक्तिसिंह यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, या धोरणामध्ये , कारखान्यांमध्ये उपलब्ध संसाधनांचा उपयोग करुन अतिरिक्त पैसे मिळवण्याला प्राधान्य दिले जाईल. कारखान्यात गाळप क्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत राज्य सरकार कैथल सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 25०० टन प्रतिदिन हून वाढवून 35०० टन प्रतिदिन करण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. ज्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया प्रगतीवर आहे. त्यांनी केनयार्ड मध्ये गाळपासाठी आणलेल्या ऊसाची तपासणी केली आणि अधिकार्‍यांना साखरेचा रिकवरी दर वाढवण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी कैथल सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जगदीप सिंह यांनी सांगितले की, 12 जानेवारीपर्यंत 12.70 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन एक लाख 16 हजार 100 क्विंटल साखरेेचे उत्पादन केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here