टांझानियामध्ये ऊस उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू

230

दार एस सलाम : टांझानियात ऊस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून देशातील साखरेची टंचाई संपुष्टात येईल, असा विश्वास कृषी मंत्री हुसैन बाशे यांनी व्यक्त केला. बाशे यांनी सांगितले की, ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये ऊस उत्पादन क्षेत्रात छोट्या प्रमाणावर ऊस उत्पादकांसाठीच्या सिंचन योजनांचे निर्माण करण्याचा समावेश आहे. बाशे यांनी टांझानियातील शुगर बोर्ड आणि राष्ट्रीय सिंचन आयोगाच्या सिंचन योजनांच्या निर्मितीसाठी ऊस उत्पादक क्षेत्रातील अशा ठिकाणांची निश्चिती करण्याचे निर्देश दिले आहेत.

बाशे यांनी टांझानियातील शुगर बोर्ड द्वारा आयोजित मोरोगोरो विभागातील शुगर सेक्टरमधील हितधारकांच्या बैठकीत सांगितले की, देशात छोट्या शेतकऱ्यांकडून उत्पादित केला जाणारा बहुतांश ऊस पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ते म्हणाले की, यासोबतच गुणवत्तापूर्ण उसाच्या बियाण्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यातून चांगले उत्पादन मिळू शकेल. बाशे यांनी टांझानिया कृषी संशोधन संस्थेला (TARI) उसाचे उच्च उत्पादन करणाऱ्या बियाण्यांचा शोध घेण्याचेही निर्देश दिले. टांझानियाच्या शुगर बोर्डचे महासंचालक केनेथ बेंगेसी यांनी सांगितले की, उसाचा तुटवडा हा देशातील साखर साठा घसरण्याचे मुख्य कारण आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, टांझानियातील देशांतर्गत साखरेची मागणी ४,७०,००० मेट्रिक टन आहे. तर देशातील पाच साखर कारखान्यांची वार्षिक उत्पादन क्षमता ३,७८,००० मेट्रिक टन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here