भोगावती कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न : अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील

कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी दिली. शाहूनगर परिते येथे नूतन अध्यक्ष पाटील व नूतन उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी कार्यालय प्रवेश केला. पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर व पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष क्रांतिसिंह पवार-पाटील उपस्थित होते.

या पदग्रहण समारंभावेळी राहुल पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार झाला. तर संचालक केरबा पाटील व संचालक कृष्णराव पाटील यांच्या हस्ते राहुल पाटील व क्रांतिसिंह पवार-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, खातेप्रमुख, सभासद व कामगार उपस्थित होते. भोगावती कामगार सोसायटीच्यावतीनेही नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here