शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम, 2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) नत्र (N), फॉस्फरस (P), पोटॅश (K) आणि गंधक (S) या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आणि खरीप हंगाम, 2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी) फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.

फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरील अनुदान हे 01-04-2010 पासून पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी युरिया 25 ग्रेडची खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने रब्बी हंगाम, 2022-23 साठी 01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली असून खरीप हंगाम, 2023 साठी 1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खते अनुदानित दरात देण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सरकार खरीप हंगाम 2023 साठी 38,000 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ होणार असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत डीएपी आणि इतर फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल आणि फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण देखील शक्य होईल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here